एक विनंती, ज्यांना मराठी समजते त्यांनी कृपया मराठीतच वाचावे
दारू आणि आपली अर्थव्यवस्था मराठी भाषांतर खाली पहा
I never thought, I would write something on this subject. But what I saw, in the last 24 hours really confused me. Alcohol means people only remember parties and nonsense. There are also countries in the world, whose traditional business is manufacturing wine and alcohol. If you ask some, what have you earned so far? So they show the high quality & expensive liquor bottles in their house. But that is not the case in India. Here the drinkers are called BEWADA & SHARABI. Till yet, many jokes have been made about these drinkers, But it is indeed a situation to be honored.
In our country, the lockdown started on March 25, all the shops were closed except for the essentials, and then there was a doubt in my mind, what will happen to the people who are addicted to alcohol every day? But then I thought, maybe this is the time for them to give up alcohol. But 8 days later in the lockdown, news came that Rishi Kapoor had demanded the opening of liquor shops along with the necessary ones and it seemed that someone had raised the voice of thirsty people and all the drinkers welcomed him.
Although we see a lot of people who drink alcohol every day, but many of them drink alcohol in the ceremonies like wedding, birthday, Holi, New Year parities etc. Some people thought it is symbol of high society. They do not belong to the so-called lower class. Also, we were completely ignoring the news that how much does it benefit the economy? Yes, we hear that the government gets a lot of revenue from the sale of liquor.
But our today’s situation is very bad. Covid19 and lockdown have put the economy in crisis. Every economist is telling you, how bad the next situation is? There are many plans to revive the economy, and in the process, someone realizes that opening liquor shops is the best way to revive the economy. Because, we have a large number of alcoholics. There is no discrimination between rich and poor among alcoholics. Everyone buys what he can afford. This could lead to better demand for alcohol, experts think. At the same time, a survey has found that staying at home for long periods of time is detrimental to people's mental health, and alcohol may be the best solution. Some are of the opinion that people who have been locked up in the house for so many days on the pretext of drinking alcohol will start coming together.
And from May 4, 2020, the government decided to reopen the liquor shops and there was a loud of cheer between drinkers. The day before, shopkeepers and police were setting up circles for social distancing, preparing the situation ahead, while many alcoholics were collecting money. Planning to buy alcohol, snacks etc. And finally the day dawned. Queues began at 7 o'clock in the morning in front of the shops, which opened at 10 o'clock. Alcoholics always have a sense of belonging, they never selfish. A helping hand is always given to 1 to 2 peoples and that’s why after opening the shops, all the alcoholics bought these for themselves and their friends and family.
The first day's shopping figures will also be released in the upcoming days, as these alcoholics have helped move the country's economy. And perhaps that is why the government has so much faith in these alcoholics, which is why the Delhi and Andhra Pradesh governments have announced 50 to 75 per cent price hikes. Other states are also considering the same.
Till yet, we call those drunker as nonsense (BEWDA & SHARABI); the same people have come forward to revive the economy of our country.
Visit to below links for releases till yet:
__________________________________________________________________________________________
दारू आणि आपली अर्थव्यवस्था
मला असं कधीच वाटलं नव्हतं, की या विषयावर मी काहीतरी लिहीन. पण गेल्या चोवीस तासात जे काही पाहिलं त्यामुळे खरंच मी गोंधळून गेलो. दारू म्हणजे लोकांना फक्त पार्ट्या आणि बेवडे आठवतात. जगात असेही देश आहेत, ज्यांचा पारंपारिक व्यवसाय दारू हाच आहे. काहींना जर विचारलं की तुम्ही आजवर काय कमावलं? तर ते त्यांच्या घरातील उच्च प्रतीच्या महागड्या दारूच्या बाटल्या दाखवतात. पण भारताची परिस्थिती तशी नाही. येथे दारू पिणार्यांना बेवडेच म्हटले जाते. आजवर या दारु पिणाऱ्यांवर अनेक जोक्स बनले आहेत पण खरंच यांचा सत्कार करावा अशी परिस्थिती आहे.
आपल्या देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाला आवश्यक वस्तू व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद ठेवली गेली आणि तेव्हा मनात शंका आली, की ज्या लोकांना (बेवड्यांना) रोज दारू पिण्याची सवय आहे, त्यांचे काय हाल होत असतील? पण नंतर वाटले कदाचित हीच वेळ आहे, त्यांची दारूपासून परावृत्त होण्याची. पण लॉकडाऊनला आठ दिवस होतात ना होतात, तोच बातमी आली की ऋषी कपूर यांनी आवश्यक दुकानांसोबत दारूची दुकाने खोलण्याची मागणी केली आहे आणि असे वाटले की, कोणीतरी तळीरामांचा आवाज उचलून धरला आहे आणि सर्व दारू पिणाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
आपल्याकडे अनेक रोज दारू पिणारे लोक असले तरी बरेच जण लग्न-हळद, वाढदिवस, होळी, गटारी, थर्टी फर्स्ट अशा समारंभानिमित्त मद्य सेवन करतात. मी मद्यसेवन यासाठी म्हटले कारण ते स्वतःला उच्च राहणीमानातील आणि प्रतिष्ठित समजतात. बेवडे म्हणवले जाणाऱ्या खालच्या श्रेणीत त्यांचा समावेश होत नाही. तसेच आपण या बातमीकडे पूर्ण दुर्लक्ष करीत होतो की त्यातून अर्थव्यवस्थेला किती फायदा होतो? हो, आपल्याला हे ऐकिवात आहे की, दारूच्या विक्रीतून सरकारला खूप मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.
पण आजची आपली परिस्थिती फार वाईट आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. प्रत्येक अर्थतज्ञ पुढील येणारी परिस्थिती किती वाईट आहे, हे सांगत आहेत. अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या योजना पुढे येत आहेत आणि त्यातच कोणाच्यातरी हे लक्षात आले की दारूची दुकाने उघडणे, हा सध्याच्या काळात अर्थव्यवस्था सावरण्यासाठी उत्तम उपाय आहे. कारण आपल्याकडे दारू पिणाऱ्यांची संख्या कमी नाही. दारू पिणाऱ्यांमध्ये गरीब श्रीमंत हा भेदभाव नाही. प्रत्येक जण आपल्याला पचेल आणि परवडेल याप्रमाणे खरेदी करतात. यामुळे दारूला चांगली मागणी येऊ शकते, असे अर्थ तज्ञांचे मत होते. त्याचबरोबर बरेच दिवस घरात राहिल्यामुळे लोकांचे मानसिक स्वास्थ बिघडत आहे, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे आणि कदाचित दारू हाच यावरील जालीम उपाय असावा. हळूहळू लॉक डाऊनमध्ये शिथिलता देखील आणली जात आहे त्यामुळे दारू पिण्याच्या निमित्ताने इतके दिवस घरात कोंडून घेतलेले लोक एकत्र येण्यास सुरुवात करतील असेही काहींचे मत आहे.
आणि 4 मे 2020 पासून सरकारने दारूची दुकाने पुन्हा सुरू करावी असा निर्णय घेतला आणि तळीरामांमध्ये एकच जल्लोष झाला. आदल्या दिवशी दुकानदार आणि पोलीस सोशल distancing साठी चौकटी आखत होते, येणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेत होते तर अनेक घशाला कोरड पडलेले महामानव पैशांची जमवाजमव करत होते. चकण्याची, दारू खरेदीची योजना आखत होते आणि अखेर दिवस उजाडला. दहा वाजता उघडणाऱ्या दुकानांसमोर सकाळी सात वाजल्यापासून रांग लावणे सुरू झाले. दारू पिणाऱ्यांमध्ये नेहमीच एक आपुलकीची भावना असते. कधी ते स्वतःपुरते पाहत नाही. 1-2 जणांना मदतीचा हात नेहमीच दिला जातो आणि त्यामुळेच दुकाने उघडल्यानंतर सर्व मद्यप्रेमींनी स्वतःबरोबरच आपल्या मित्र परीवारासाठी ही खरेदी केली.
येणाऱ्या पुढील दिवसात पहिल्या दिवसाच्या खरेदीचे आकडे प्रसिद्ध होतीलही, कारण या मद्यप्रेमींनी देशाचे अर्थचक्र हलविण्यास मदत केली आहे. आणि कदाचित सरकारलाही या मद्यप्रेमींवर इतका भरवसा आहे म्हणूनच दिल्ली आणि आंध्र प्रदेश सरकारने 50 ते 75 टक्के भाववाढ जाहीर केली आहे. इतरही राज्य याचा विचार करीत आहेत.
आज पर्यंत आपण ज्यांना बेवडा, शराबी असे संबोधले; तेच लोक आपल्या देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पुढे झाले आहेत.
Click below links for releases till yet:

Comments
Post a Comment
The article is useful to you, let me know.